आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत भारतातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य वृद्धीकरण रोजगाराच्या दिशेने नेणारा प्रकल्प.
भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेत एक ऐतिहासिक बदल घडविण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना ही महाराष्ट्रात सुरू होणार आहे ज्याचे उद्घाटन भारताचे आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी करतील . या योजनेचा प्रारंभ दिनांक 20 सप्टेंबर रोजी होणार आहे या उपक्रमाचा उद्देश पारंपारिक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य वृद्धीकरणाच्या वाढत्या गरजेवर लक्ष केंद्रित करणे हा आहे, ज्यामुळे त्यांना आधुनिक रोजगाराच्या बाजारपेठेत आवश्यक ते कौशल्ये प्राप्त होतील.
भारताची शैक्षणिक व्यवस्था ही पारंपारिकरित्या सैद्धांतिक शिक्षणावर भर देत आली आहे. परंतु काळानुरूप बदल यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही परंतु व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे .आचार्य चाणक्य योजना जी देशभरात सुरू होणार आहे ही पारंपारिक शिक्षणावर आधारित शैक्षणिक व्यवस्थेत कौशल्याधारित प्रशिक्षणाची गरज वाढत आहे .आचार्य चाणक्य योजना जी देशभरात अमलात आणली जाणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील १००० महाविद्यालयांची निवड झाली आहे .ज्यामध्ये अहमदनगर मधील के.जी .कला व वाणिज्य महाविद्यालयाची निवड झाली आहे . या कौशल्य विकास केंद्रामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यास सक्षम होतील.
या योजने मध्ये बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांमधील रोजगार उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्थसहाय्य करणे, कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगार क्षम बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत केंद्र, राज्य व जिल्हा पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजनांच्या माध्यमातून राज्यातील १५ ते ४५ वयोगटातील युवक युवतींना विविध ३७ क्षेत्रांमध्ये (बँकिंग, माहिती तंत्रज्ञान ,बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स इ. )प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवून रोजगार अथवा स्वयंरोजगारच्या संधी पुरवण्यात येतील .
नॅशनल स्कील्स कॉलीफिकेशन फ्रेम वर्क (NSRF) अन्वये स्थापित मानंकानुसार १८०० पेक्षा अधिक व्यवसायिक अभ्यासक्रमांचे संबंधित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाअंती उमेदवारांचे मूल्यमापन आणि प्रमाणिकरण हे केंद्र शासनाच्या नॅशनल काँन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग तर्फे करण्यात येईल. ही योजना अमलात आणल्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर फायदे मिळणार आहे .जसे आजचे उद्योग हे अशा विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे जे त्वरित काम करतील त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योगांकडे वेळ व पैसा उपलब्ध नाही. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना सैध्दांतिक व व्यावहारिक ज्ञानाने सक्षम करेल ज्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच आधुनिक कामाच्या पद्धतीत तंत्रज्ञानाचा वाढता वापर होत आहे. ही योजना विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकवेल ज्यामुळे कौशल्याधारित प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याच्या क्षमतेत, तर्कसंगत विचारात आणि आत्मविश्वासात वाढ करेल. यामुळे विद्यार्थ्यांना कामाच्या संधी निर्माण होतीलच पण त्याबरोबर स्वतःच्या व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित करेल असा विश्वास वाटतो .
आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना ही सुरू होत आहे आणि के.जी .कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स ही शिक्षण संस्था या योजनेचा एक भाग बनत आहे .ही योजना विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल .ज्यामुळे पारंपारिक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट करिअर संधी मिळतील .
प्रा. डॉ.स्वाती मुनोत
कॅम्पस डायरेक्टर के .जी. कॉलेज ऑफ
आर्ट्स अँड कॉमर्स अहमदनगर.