Dr.Bhavttula’s Visit

प्रत्येक  वेळी सिद्ध  करण्याच्या संधी  दुर्मिळ :डॉ. भगवतुला
जीवनात स्वतःला  प्रत्येक  वेळी सिद्ध करण्याच्या संधी दुर्मिळ  असतात,या हातातून जाऊ देऊ नका,अडचणी कितीही आल्या तरी आपण यश मिळवू शकतो.असे प्रतिपादन जर्मनी स्थित मेर्सीडीस बेंझ संचालक व चिफ टेकनॉलॉजि ऑफिसर अशोक लेलँड समूहाचे डॉ.शेषू भगवतुला  यांनी केले.के .जी कला  व वाणिज्य महाविद्यालयास भगवतुला यांनी सदिच्छा  भेट दिली त्या वेळी ते बोलत होते.
जेव्हा तुम्ही एखादे नवे कार्य सुरु करता तेंव्हा अनेकवेळा अपयश पदरी पडते.त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचे प्रयत्न बंद करता.या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तो पर्यन्त प्रयत्न करतात. अपयशाला घाबरू नये त्यातून यशश्वी होण्यासाठी आपण आणखी काम करू शकतो याचा शोध घ्यावा.स्वतःवर विश्वास असल्यास काही अवघड नाही.त्यांनी  के.जी  कॅम्पस मधील शैक्षणिक सुविधा व महाविद्यालयीन कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले. भविष्या मध्ये अशोक लेलँड समुहा  तर्फे के जी कला व वाणिज्य महाविद्यालय व फिनिक्स हॉटेल मॅनॅजमेन्ट  इन्स्टिटयूट मधील विद्यार्थीयांसाठी उद्योजिकय प्रशिक्षण देण्याबाबत करार करण्या बाबतचे मत व्यक्त केले.या वेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ ,स्वाती मुनोत यांनी केले.या प्रसंगी संसंस्थेचे  विश्वस्त संचालक किशोर मुनोत,प्रा.खासेराव शितोळे,फिनिक्सचे प्रा.वसीम शेख व प्रा.तुषार औटी,प्रा.डॉ.वर्षा कीर्तने प्रा.आनंद त्रिपाठी, प्रा.स्नेहल बोरावके,प्रा. सविता चव्हाण,[प्रा. मोहिनी शिंदे ,प्रा.वीरेंद्र पाटील,प्रा.योगेश चाकोते ,संतोष मुनोत ,निखिल मुळे ,अमृता मुळे  आदी उपस्थित होते